Wajahat Khan शर्मिष्ठा पनोलीविरुद्ध तक्रार देणाऱ्या वजाहत खानला हिंदू देवतांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : कायद्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोली हिच्या अटकेस कारणीभूत ठरलेल्या वजाहत खानलाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. खानने हिंदू धर्म आणि देवतांविषयी सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि चिथावणीखोर मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. Wajahat Khan

कोलकात्यातील गोल्फ ग्रीन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, खानने 1 जूनपासून पोलीस समन्सकडे सातत्याने दुर्लक्ष केले, दरम्यानच्या काळात तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली आहे. Wajahat Khan

वजाहत खानने आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर (X) आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर हिंदू धर्म, देवता आणि परंपरांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषा वापरल्या होत्या. “रेपिस्ट संस्कृती”, “मूत्रपान करणारे लोक” यांसारख्या अपशब्दांचा वापर करून त्याने हिंदू समाजाबद्दल द्वेष पसरवणारी विधाने केली होती. या प्रकरणात श्रीराम स्वाभिमान परिषद या संघटनेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.



या तक्रारीमध्ये वजाहत खानविरोधात भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती, यामुळे सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला होता.

याच वजाहत खानने काही दिवसांपूर्वी शरमिष्ठा पनोली हिच्याविरोधात तक्रार केली होती. पनोलीनं ऑपरेशन सिंदूर बाबत मुस्लिम बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मौनावर टीका करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने काही प्रमाणात धार्मिक भाष्य करत अत्यंत कठोर आणि द्वेषपूर्ण शब्दप्रयोग केले होते. परिणामी तिला 30 मे रोजी अटक करण्यात आली होती. शर्मिष्ठाने नंतर व्हिडिओ डिलीट केला. सार्वजनिकरित्या माफीही मागितली. सध्या तिला कोर्टाकडून कडक अटींसह तात्पुरता जामीन देण्यात आला आहे.

या घडामोडींमुळे आता वजाहत खानची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. एका बाजूला शर्मिष्ठासारख्या इन्फ्लुएंसर विरोधात कारवाईसाठी पुढे सरसावणारा खान, दुसऱ्या बाजूला स्वतःच धार्मिक तेढ पसरवणाऱ्या भाषेचा वापर करत असल्याचे समोर आल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे.

खानला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी याला न्यायचा विजय म्हणत हिंदू समाजावरील विखारी प्रचाराला चपराक दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Wajahat Khan, who filed a complaint against Sharmishtha Panoli, arrested for posting objectionable content on Hindu deities

महत्वाच्या बातम्या