Mumbai : अस्तित्वात नसलेल्या इमारतीमध्ये 143 मतदार, मुंबईत निवडणुकीआधी मत घोटाळ्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbaiअस्तित्वात नसलेल्या इमारतीमध्ये 143 मतदार निवडणूक यादीत दाखविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केला आहे. अदृश्य इमारती, अस्तित्वात नसलेले मतदार तसेच कोरे ‘एपिक’ कार्ड यांचा वापर करून महाभयंकर वोट चोरी करण्याचे कारस्थान रचण्यात आले असल्याचे आरोप शितल म्हात्रे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहेत.Mumbai

ही वोट चोरी म्हणजे एक मोठा घोटाळा आहे. आगामी निवडणुकीच्या निकालामध्ये फेरफार करण्यासाठी सत्ताधारी भाजप तसेच निवडणूक आयोगामध्ये असलेले साटेलोटे यातून उघड झाले आहे. सदर इमारत फक्त कागदावर आणि मतदार यादीतच अस्तित्वात आहे. ती मुंबईतील सामान्य नागरिकांना दिसत नाही, पण निवडणूक आयोगाला मात्र स्पष्टपणे दिसते. ही निव्वळ संघटित वोट चोरी आहे.”, असा आरोप शितल म्हात्रे यांनी केला आहे.Mumbai



शितल म्हात्रे म्हणाल्या, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांमधील मोठ्या त्रुटींवरून मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेऊन मुंबईतील लोकशाही पायदळी तुडवण्यासाठी मतदार याद्या पद्धतशीरपणे दूषित करत आहे. निवडणूक आयोग आता स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून नाही, तर भाजपची निवडणूक यंत्रणा म्हणून काम करत आहे.

म्हात्रे यांनी आणि त्यांच्या टीमने बोगस मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, दहिसर (पश्चिम) आयसी कॉलनी, रोड नंबर 5 येथे भागडालाने ही इमारत असून त्या इमारतीमध्ये 143 मतदार असल्याची नोंद निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत दाखवण्यात आली आहे. पण, मुंबई काँग्रेस तर्फे माजी नगरसेविका शितल म्हात्रे आणि त्यांच्या टीमने शोध घेतला असता सदर ठिकाणी अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ज्या अर्थी इमारतच अस्तित्वात नाही तिथे 143 मतदार कसे काय असू शकतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

म्हात्रे म्हणाल्या, गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयुक्त आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटीत मिळालेली आश्वासने हवेत विरली असून हा घोटाळा सुरूच आहे, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वीच मतदार यादीत बोगस मतदारांची नावे घुसविण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोरे मतदान कार्ड, ब्लँक चेक यासारखा हा घोटाळा असून फक्त एका इमारतीपुरता मर्यादित नाही.” असेही त्या पुढे म्हणाल्या. तसेच, “कोरे मतदान कार्ड ही ‘चूक’ कशी असू शकते? हे कार्ड म्हणजे ब्लँक चेकसारखे आहेत. कोणीही त्यांचा वापर करून बोगस मतदान करू शकते. हा जाणीवपूर्वक केलेला फौजदारी गुन्हा आहे.

143 voters in non-existent building, allegations of vote rigging before elections in Mumbai

महत्वाच्या बातम्या