विशेष प्रतिनिधी
मुंबई : Navneet Rana एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांनी पंधरा सेकंदासाठी पोलीस बाजूला करा असे आव्हान देणे माजी खासदार नवनीत राणा यांना भोवण्याची चिन्हे आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले आहे.Navneet Rana
नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला होता. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिले होतं. त्या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं.
आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, अse नवनीत राणा म्हणाल्या होत्या. राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणांनी उपस्थित राहावे असे आदेश आहेत.
नवनीत राणा गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील.”
15 second challenge to Navneet Rana, Hyderabad court summons
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…