विशेष प्रतिनिधी
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन 5 जणांचा मृत्यू आज सकाळी 11 वाजता हा प्रकार भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. या स्फोटाने नागरीक भेदरून गेले.
जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शन २३ क्रमांकाच्या इमारतीत हा भीषण स्फोट झाला. मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. या भीषण स्फोटाने आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.
या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पोहचला. अनेकांनी कारखान्याकडे धाव घेतले. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. धुराचे लोट दूरवरून दिसत होते. अनेक वाहनधारकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच चित्रीकरण केले.
5 killed in explosion at Jawaharnagar Ordnance Company
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले