विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा आरोप त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या टीमकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “बीड पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही. या आरोपींकड पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.या बी टीमनेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे. त्यांनीच आरोपींना पळीन जाण्यासाठी गाडी आणि पैसे पुरवले.
मात्र, बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.” शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
एकीकडे देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज उजेडात आला आहे. तर अनेक आरोपींना पोलिसांचंच पाठबळ असल्याचंही उघडकीस आलं होतं. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
Accused who killed Santosh Deshmukh, B team still active in Beed, Dhananjay Deshmukh’s allegation
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत