अभिनेत्री वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे यांची लाखो रुपयांची फसवणूक, बिल्डर आणि दिग्दर्शक अविनाश जाधववर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिग्दर्शक आणि बिल्डर अविनाश जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दिग्दर्शक जाधव याने त्यांना डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगल्या परताव्याचे वचन दिले होते. सुरुवातीला काही पैसे दिल्यावर नंतर त्याने परतावा देणे बंद केले. तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार नोंदवली असून, जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृणालीनी सुभाष जांभळे अभिनेत्री असून त्यांनी मराठी रंगभूीमीवर तसेच चित्रपटात काम केलं आहे. संशयित आरोपी अविनाश जाधव यांच्याशी तिची व्यावसायिक ओळख होती. आपण चित्रपट निर्माता व बिल्डर असल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं. डोंबिवली येथील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देईन, अse आश्वासन त्याने दिलं होतं. एवढंच नव्हे तर वर्षभरात मूळ रक्कम परत देईन, असा दावाही त्याने केल्याचं म्हटले आहे.

नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये तक्रारदार मृणालिनी आणि तिच्या ओळखीने, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, तसेच आणखी तीन जणांनी मिळून चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक जाधव यांच्याकडे केली. सुरूवातीला जाधव याने परतावा म्हणून काही सुमारे साडेचार लाख दिले. मात्र त्यानंतर काही काळाने त्याने परतावा, रिटर्न्स देणं बंजच केलं. मृणालिनी, वर्षा उसगावकर व इतरांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला, पैसे मागण्याचा प्रयत्न केला. पण जाधवने काही दाद दिली नाही, उलट तो मोबाईल क्रमांक आणि त्याचा पत्ता , दोन्ही बदलत राहिला.

अखेर तक्रारदारांनी डोंबिवली गाठली आणि जाधवला गाठत पैशांबद्दल विचारणा केली. त्यावर त्याने “ मी पैसे देणार नाही, जे काय करायचं ते करा” अशा अरेरावीच्या शब्दांत, उर्मट स्वरांत उत्तर दिलं, धमकी दिली, असा आरोप तक्रादारांनी केला आहे. आपली व सहकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व तक्रारदारांनी 26 फेब्रुवारी रोजी, दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाधव याच्याविरोधात फिर्याद नोंदवली. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून ते चौकशी करत आहेत.

Actresses Varsha Usgaonkar, Mrunalini Jambhale Duped of Lakhs; Case Filed Against Builder Avinash Jadhav

महत्वाच्या बातम्या