विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Aditya Thackeray कोणी कोणाचं कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचं कधीच कौतुक करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांविषयीची नाराजी व्यक्त केली आहे.Aditya Thackeray
साहित्य संमेलन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला होता, यावेळी पवारांनी शिंदे यांचे तोंड भरून कौतुकही केले होते.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्या नंतर पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे. राऊत साहेबांनी काल यावर उत्तर दिलय. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाही, महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याच पाप केलं. त्यांनी दिलेल नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते, ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केले.
पुंक एकदा निवडणूक आयोगावर आगपाखड करताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत एक साम्य आहे. जे कोणी जिंकलं आहे, त्यात आयोगाचा मोठा हात आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानताना भाजपच्यावतीने आम्ही ही चर्चा करतोय, निवडणुकीत फ्रॉड झालं आहे. ते जगासमोर आणणं गरजेचं आहे. निवडणूक निपक्षपातीपणे होतात का, याचं उत्तर आयोगाने द्यावे. आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राज्यभरातील नेते भेटत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ही यंत्रणा फ़्री आणि फेयर वाटत नाही.
“ईव्हीएमबाबत अनेक पक्षाची वेगळी मते आहेत. आम्ही जिंकलो आणि हरलो तरी आमचं मत ठाम आहे. निवडणुकीत आमचं मत कुठे जातं, ते आयोगाने स्पष्ट करावं. रिकाऊंटही आयोग देत नाही. मॉकपोल घ्या म्हणून सांगितलं जातं. ईव्हीएमबाबत अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे.
व्हीव्हीपॅटमधील मतांची पावती खाली पडते का?. महाराष्ट्रात मतदान कसं वाढलं? हे सांगा. मतदानाच्या शेवटच्या वेळेत टोकन दिलं जातं. मतदारांना किती टोकन दिलं हे आयोगाने सांगा” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेत.
जे पळून जात आहेत, ते जय महाराष्ट्र करत नाहीत, जय गुजरात करत जात आहेत. चौकशीला घाबरून जात आहेत. त्यामुळे ते जय महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत. आम्ही मागच्या महिन्यात शरद पवारांना भेटलो. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो. आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो, ते कशासाठी भेटलो ते समोर आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
Aditya Thackeray is also angry with Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत