विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar शरद पवार यांना डॉक्टरांनी चार दिवस विश्रांती घ्यायला सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातच त्यांच्या छातीत कफ झालेला जाणवत होता. त्यामुळे बोलायला त्रास होत होता अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.Ajit Pawar
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी कालच पुढील चार दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला येत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत होती. एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाषणही देता आले नाही. त्यानंतर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस संचलन मैदान, पुणे येथे राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, त्यादिवशी बोलताना त्यांना अडचण येत होती. त्याचवेळी आम्ही सर्वांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण साहेब म्हणाले की, मला कोल्हापूरला जायचे आहे, तिथे माझा कार्यक्रम आहे. मग ते कोल्हापूरला रवाना झाले. कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांचा त्रास वाढला. मग तिथून ते मुंबईला गेले. आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे ते विश्रांती घेत आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. २३ जानेवारी रोजी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. हे पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितले. या कृतीमधून अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे बोलले गेले.
Ajit Pawar gave important information about Sharad Pawar’s health
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार