विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar अनेक वर्षे सरकारे आली आणि गेली, परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद दिला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवादही दिले.Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे जगविख्यात शिल्पकार डॉ. राम सुतार, पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, उद्योजक इंद्रनील चितळे या दिग्गजांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण यावर काम सुरू आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने पक्षाची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात अशी व्यक्तीमत्व जन्माला आली, त्यामुळे महाराष्ट्र वेगळ्या उंचीवर जाऊन पोचला आहे. तरुणांनी या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी लोकसभेत मराठी वगळता इतर भाषेत भाषण करणार नाही असे जाहीर केले होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.
Ajit Pawar thanked Prime Minister Narendra Modi for this
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…