Ajit Pawar : अजित पवारांनाही खात्री नव्हती १० ते १२ जागा येतील, आमच्यामुळे विजय, नरेंद्र महाराज यांचा दावा

Ajit Pawar : अजित पवारांनाही खात्री नव्हती १० ते १२ जागा येतील, आमच्यामुळे विजय, नरेंद्र महाराज यांचा दावा

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : Ajit Pawar  खुद्द अजित पवारांनाही खात्री नव्हती की त्यांच्या १० ते १२ जागा येतील. ते चित्र बदललं. एकनाथ शिंदेंना वाटतंय की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा विजय मिळाला. मात्र त्यांच्या विजयामागे आम्हा साधू-संतांचं योगदान आहे, असे नरेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.Ajit Pawar

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर नरेंद्र महाराज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,

मुस्लीम समाज हिंदू संपवण्यासाठी, आपल्या ऐक्यासाठी ज्यांना विरोध होतो त्यांच्यामागे हिरवे झेंडे घेऊन उभा राहात असेल तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे. संतांनी जागृत झालं पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं. त्यातून विधानसभेला चित्र बदललेलं दिसले. आम्ही ठरवलं, तर राजकारण्यांना खुर्चीवरून खाली खेचू शकतो.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

नरेंद्र महाराज म्हणाले, राजकीय लोक आमचा आवाज दाबून टाकतात. त्यामुळे त्यांना घाबरून चालणार नाही. राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे. आमचं हिंदूंचं रक्षण केलं नाही, तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचू शकतो हा जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहचवायला हवा.

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीत संघ आणि आम्ही सर्व साधू-संतांनी मिळून चित्र बदललं आहे. बाकी त्यांनी काहीही दावा करावा. लाडकी बहीण योजना वगैरे.. त्याचा मुळीच परिणाम नाहीये. आम्हा साधूसंतांचा हा परिणाम आहे. आम्ही सर्व साधू-संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की बदल ही काळाची गरज आहे. जागृत व्हा. त्यातून हे चित्र उभं राहिलं, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे.

“दिल्ली विधानसभा निवडणुकीतलं चित्रही त्यामुळेच बदललं आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात एक चांगली गोष्ट झाली आहे. आम्ही डरेंगे तो मरेंगे हा संदेश दिला, त्यातून सगळे संत जागृत झाले. आमचे शंकराचार्य कुंभमेळ्यापासून लांब राहायचे. त्यांनाही त्यात उतरावं लागलं. त्यातून फार मोठी जनजागृती झाली आहे”, असा मुद्दा नरेंद्र महाराज यांनी उपस्थित केला आहे.

Even Ajit Pawar was not sure that 10 to 12 seats will be won, because of us victory, Narendra Maharaj claim

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023