विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात यावे यासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. त्यामुळे घाबरून अजित पवार गटात प्रवेश केला होता, असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांनी केला आहे. Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे.
पुन्हा शरद पवार गटात आल्यावर अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता. परंतु आता आपण ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. केवळ जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता. जर जितेंद्र आव्हाड यांचा मला फोन आला नसता तर मी आत्महत्या केली असती. पण आज मी घरवापसी केली असून मरेपर्यंत जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असतील.
खरं तर माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठविण्याचे प्लॅनिंग होते. माझ्या मित्रांना देखील पोलिसांकडून धमक्या दिल्या जात होत्या. ईडीची धमकी दिली जात होती. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोन लावून धमक्या देण्याचे काम करत होते. त्यांनी पक्षप्रवेशासाठी मला ब्लॅकमेलिंग केले होते, असा आरोप पवार यांनी केला.
त्यांच्या ब्लॅकमेलिंगला मी आता बळी पडणार नाही. माझी एवढीच चूक झाली की मी जितेंद्र आव्हाडांसोबत बोलायला हवे होते. पण मी तणावात होतो, त्यामुळे हा सर्व प्रकार घडला, असे अभिजित पवार म्हणाले.
अभिजीत पवार आमचेच नातलग आहेत. पण आता पवारच यायला उशीर करायला लागले, तर मग बाकी कधी आपल्याकडे येतील, असे त्यांच्या प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.
Allegation of Jitendra Awhad personal assistant, blackmailing to join Ajit Pawar group
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा