विशेष प्रतिनिधी
पुणे : आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी तुमच्या पाठिशी आहेत, प्रगति व्हावी तुमची झकास’ असा उखाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतला आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकटादात उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवत किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात अमृता फडणवीस यांनी महिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना”चा उल्लेख करून एक उखाणा घेतला. महिलांना मनमोकळेपणे जगण्याचा आणि विरोधी विचारांनाही हास्याने सामोरे जाण्याचा सल्ला देत अमृता फडणवीस म्हणाल्या, आपल्याल जर छान, हेल्दी जगायचं असेल तर रोज हसायचं.
ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
कोणी काही टोला मारला, टोमणा लगावला तरी तरी तो ऐकायचा आणि सोडून देऊन हसायंच, मी तेच केलंय, माझ्या जीवनात मला जे ठीक वाटतं ते मी केलं, माझ्या मुलीसाठी पण पुढे मी एक वाट मोकळी करून शकेन असं वाटलं, ते मी केलं. माझ्ं लग्न झाल्यानंतरही मी गाणं सुरू ठेवणं असो, नाचणं असो, बँकिंग असो, मी ते सगळं चालू ठेवलं. कोणीही मला टोला मारला , टोमणे ऐकवले तर मी ते फक्त ऐकायचे, हसायचे आणि पुढे निघून जायचे,
माझ्या लाडक्या पतीदेवाच्या लाडक्या बहीणी म्हणत त्यांनी समोरच्या महिलांशी आपलं नणंद- भावजयीचं नातं असल्याचं सांगत उशीरा येण्याबद्दल मी सॉरी तर म्हणणार नाही, मी बसं एढचं म्हणेन की ‘मी पुन्हा येईन’ असा नारा देत पुन्हा येईन तेव्हा लेट येणार नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी हसतखेळत, मजेशीर अंदाजात भाषण केलं.
Amrita Fadnavis said for Ladki Bahin Yojana
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल