विशेष प्रतिनिधी
नांदेड : Ashok Chavan आरोप होतात, प्रत्यारोप होतात हा राजकारणाचा भाग आहे.आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची आहे. तेव्हा राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झाला, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनातील साल बोलून दाखविली.Ashok Chavan
मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी त्यांचा काँग्रेस नेतृत्वाने राजीनामा घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या होत आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आवाज विरोधकांनी विधानसभेतही उठवला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. या घटनेची आता तीन यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचाही सहभाग या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण म्हणाले, असं आहे की आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची काँग्रेसमध्ये असलेली पद्धत चुकीची आहे, असं माझं मत तेव्हाही होतं आणि आजही आहे. त्यावेळी राजीनामे घेतले गेले. मग कोणत्या आधारावर राजीनामे घेतले गेले? विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल तर कारवाई करा. पण आरोप कोणीही करायचे. मी स्वत: या गोष्टीतून गेलेलो आहे. मी कोणत्याही प्रकरणाबाबत हा विषय बोलत नाही. बीडच्या प्रकरणाच्या संदर्भानेही मी हे बोलत नाही. मी हे जनरल बोलत आहे.
राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचं सत्र काँग्रेसच्या काळात होतं, ते फार चुकीचं आहे. आरोप होतात, प्रत्यारोप होतात हा राजकारणाचा भाग आहे. यात माझी काही तक्रार नाही. मात्र, केवळ आरोपाच्या आधारावर काँग्रेसच्या काळात राजीनामा घेतला गेला हे निश्चित चुकीचं आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे, अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
Ashok Chavan spoke about resignation
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22फेब्रुवारी पासून आंदोलन
- Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा
- Shashi Tharoor शशी थरूर बनले पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे चाहते, ‘या’ मुद्द्यावर झाले सहमत
- Chief Minister Delhi दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळेल का? भाजपच्या संभाव्य उमेदवार कोण आहेत जाणून घ्या