विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारमध्ये आलबेल नाही. दोन वर्षात प्रचंड गोंधळ झाला आहे. पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत हे समोर येत आहे. 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. फक्त स्थगिती नको चौकशी व्हायला हवी. सह्या कोणाच्या झाल्या, निर्णय झाले कसे हे पाहणं गरजेचे आहे अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावर थोरात यांनी चौकशीची मागणी केली आहे. कोणाच्या सह्या झाल्या हे पाहण्याची गरज आहे.
सरकार कमी पडत आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय होत नाहीत असा आरोळ करून थोरात म्हणाले, तीन महिने होऊनही मंत्र्यांना स्टाफ नाही. मंत्र्यांना स्वतःचे अधिकार नाहीत ही परिस्थिती आहे. जागरण गोंधळाच काम सुरु आहे. लोकांच्या हिताचं काम होतं नाही. कापसाच्या बाजाराची अवस्था, शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे . बसमध्ये अत्याचार होत आहेत
बीड प्रकरणावर ते म्हणाले, वाल्मिक कराड असुदे किंवा इतर कोण, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी. गुन्हेगारांवर दहशत असली पाहिजे अशी कडक शिक्षा असावी. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे काँग्रेसचा एक पूर्वीचा काळ असा होता की मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत.
लाल बहादूर शास्त्रीनी देखील एका रेल्वे अपघातानंतर राजीनामा दिला होता . हा एक नीतिमत्तेचा विषय आहे. तो पाळला पाहिजे. बीडमध्ये सर्वच कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आहेत. हे भीतीच सावट राज्यभर पसरू नये हिच आमची अपेक्षा आहे. पण त्यांना धर्माचे राजकारण करायचं आहे, लोकांची मत मिळवायची आहेत. सगळं झाकण्यासाठी हे सगळं सूरु आहे
ईव्हीएमवर संशय घेत बाळासाहेब थोरात म्हणाले, महायुतीला मते कशी मिळाली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. दोन महिन्यानंतर आता सगळं स्पष्ट होत आहे. नैतिक पातळीवर झालेली ही निवडणूक नाही.
Balasaheb Thorat’s demand regarding Rs 3200 crore works should not be just adjourned, should be investigated
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…