Bhaskar Jadhav भास्कर जाधवही उद्धव ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र, उदय सामंत यांचे संकेत

Bhaskar Jadhav भास्कर जाधवही उद्धव ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र, उदय सामंत यांचे संकेत

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : Bhaskar Jadhav  कोकणातील उद्धवसेनेचे एकमेव आमदार आणि फायर ब्रँड नेते भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आहेत. अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचं नाही.

क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभा, लोकसभेच्या प्रचारादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरमध्ये भास्कर जाधव यांचीही शिकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत .

महापालिका निवडणुका संदर्भात सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नाही. महायुती म्हणून निवडणूक लढवायची अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही.

एकनाथ शिंदे यांनी कर्तुत्व सिद्ध केले आहे. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काय चुकलं याचा आत्मचिंतन केले आहे. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Bhaskar Jadhav will also leave Uddhav Thackeray, Uday Samant hints

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

Warkaris

Warkaris : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023