Sanjay Raut : बूंद से गयी, वो हौद से नहीं आने वाली, संजय राऊत यांचा सुरेश धस यांना टोला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Sanjay Raut  आमदार धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे, ‘बूंद से गयी, वो हौद से नहीं आने वाली’ असे म्हणतात, ते त्यांच्याबाबत लागू आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार सुरेश धस याना लगावला आहे.Sanjay Raut

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंडे यांची गुप्त भेट घेतली. यावर धस यांच्यावर डीलिंग केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याला उत्तर देताना धस म्हणाले होते की , ज्यांचे आयुष्य डील करण्यात गेले. डील केल्यामुळे त्यांच्या पक्षाची वास्तुशांती झाली. ते स्वत:हा डीलर आहे. एकदा तुरूंगात सुद्धा जाऊन आले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल डील हा शब्द वापरणे पटत नाही.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

धसांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “सोडून द्या, हो सुरेश धसांकडे काय पाहताय. धसांवर कुणी विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे. धसांनी मुंडेंची भेट घेतली. ज्याक्षणी मुंडे बैठकीसाठी आले, त्याक्षणी धसांनी तिथून बाहेर पडायला हवे होते. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे होते की, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे लढत आहे.

Boond Se Gayi, Woh Haud Se Nahin Aane Wali, Sanjay Raut’s attack on Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या