विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tanaji Sawant महाराष्ट्राचे मंत्री किती किती कष्ट करतात…. त्यांच्या कष्टाच्या पैशाने मुलगा चार्टर प्लेन उडवतो, असे ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.Tanaji Sawant
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची चर्चा झाली. ऋषीराज सावंत हे पुण्यातून प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईटने बँकॉककडे रवाना झाला होते. खासगी विमान बुक करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन पेमेंटदेखील केले होते. त्यांच्यासोबत दोन मित्र होते. हे खासगी विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचले होते. मात्र तेथून ते पुन्हा चेन्नईला बोलवण्यात आले. त्यानंतर ऋषीराज सावंत हे पुण्यात परतले.
दमानिया यांनी ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांची नावे असलेले चार्टड फ्लाईट बुक केलेली कागदपत्रेही ट्विट केली आहेत.
तानाजी सावंत यांचा मुलगा नाराज होऊन मित्रांसोबत परदेशात गेला होता. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची चर्चा सुरु झाली. यावर तानाजी सावंत म्हणाले, माझ्या मुलाचे अपहरण झाले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. त्याचा फोन न आल्याने मला खुप काळजी वाटू लागली. आम्ही एकमेकांना दिवसांतून वीस फोन तरी करतो. मात्र तो अचानक विमानतळावर का गेला? या काळजीपोटी मी पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांना फोन केला. ते तिघंही खासगी विमानाने गेले आहेत. त्याच्या मित्रांची नावंदेखील माहीत नाहीत. आमच्यामध्ये नेहमीच संवाद होतो. मात्र आज त्याच्याबरोबर काहीही बोलणं झालं नाही त्यामुळे मी घाबरलो आणि अस्वस्थ झालो”.
Boy flies charter plane with minister’s hard earned money, Anjali Damania targets Tanaji Sawant
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन