MLA Asif Sheikh : औरंगजेबाला पवित्र व्यक्ती म्हणणे भोवलं, माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

मालेगाव : औरंगजेब पवित्र माणूस होता, असे औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य करणे काँग्रेसचे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांना भोवले आहे. पुण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. MLA Asif Sheikh

माजी आमदार आसिफ शेख यांनी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कार्यक्रमानंतर सोबत बोलताना, ‘औरंगजेब पवित्र माणूस होता, टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करायचा. औरंगजेब सर्व धर्मांना माननारा सर्वधर्मसमभाव विचाराचा होता. मात्र, औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्याच्या नावाचा उपयोग केला जात आहे, असं विधान केलं होतं. आता शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

माजी आमदार आसिफ शेख यांच्या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने पुण्यातील दत्ता गायकवाड यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर आसिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ शेख रशीद हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून 2014 साली विजयी झाले होते. 2019 मध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून आसिफ यांनी पुन्हा एकदा काँग्रेसने तिकीट दिले होते, मात्र एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माइल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.2022 मध्ये आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि वडील शेख रशीद यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, आसिफ शेख यांनी 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली होती. त्यांनी 20 ऑक्टोबर 2024 रोजी ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ म्हणजे ‘इस्लाम’ हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आणि 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. MLA Asif Sheikh

Calling Aurangzeb a holy person was a mistake, a case was registered against former MLA Asif Sheikh

महत्वाच्या बातम्या