एका क्लिकवर मिळणार जात प्रमाणपत्र; फडणवीस सरकारचा निर्णय लाखो नागरिकांसाठी ठरणार क्रांतिकारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाइन प्रणालीसाठी हिरवा कंदील दिला असून, लवकरच ही सुविधा प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. या नव्या संगणकीकृत प्रणालीतून अर्जदार एका क्लिकवर जात प्रमाणपत्र मिळवू शकणार आहे. ही प्रणाली पारदर्शक, जलद आणि अत्याधुनिक असेल.

यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी) आणि टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) यांनी प्रणाली विकसित केली आहे. यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना पुढील १०० दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.



नव्या प्रणालीमध्ये एआय आधारित इंटरफेस असणार आहे. अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे स्मार्ट यूजर इंटरफेस असतील अर्जदाराचे नाव, नातेवाइकांची माहिती आणि आधारवरील पत्ता प्रणालीद्वारे थेट पडताळणी होणार आहे. डीजी लॉकर वरून कागदपत्रे थेट घेतली जाणार आहेत. त्यामुळे वेग आणि विश्वासार्हता वाढणार. त्यामुळे महिन्यांपर्यंत चालणारी प्रक्रिया, काही तासांत पूर्ण होण्याची शक्यता.

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) भटक्या आणि विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागास प्रवर्ग या सर्व घटकांतील नागरिकांना शासकीय नोकऱ्या, शिक्षणातील आरक्षण, निवडणुकीतील राखीव जागा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, यासाठीची प्रक्रिया आतापर्यंत अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती.

सरकारच्या या निर्णयामुळे अर्जदारांचा वेळ, पैसे आणि श्रम वाचणार आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल.

Caste certificate will be available with one click; Fadnavis government’s decision will be revolutionary for lakhs of citizens

महत्वाच्या बातम्या