विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pratap Saranaik एसटी महामंडळाकडे असलेल्या 14,300 एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. त्यानंतर पोलिसांसह परिवहन विभागानेही याची दखल घेतली आहे. सरनाईक यांनी अधिकाऱ्यांचीआढावा बैठक घेतली. बसस्थानकांवरील सुरक्षा, आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक, एसआय तंत्रज्ञानाचा वापर यासंबंधित सूचना केल्याची माहिती सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.
सरनाईक म्हणाले, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय होता. तो झालेला नव्हता. त्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. डेपोतील बंद पडलेल्या बसेस, आरटीओच्या गाड्या 15 एप्रिलपर्यंत भंगारात घालण्याचे आदेश दिले आहेत. बसस्थानकावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. बसस्थानकांना तीन कंपन्यांकडून 2700 सुरक्षारक्षक पुरवले जातात. आता महिला सुरक्षारक्षक वाढवण्यात येणार आहेत. ‘एआय’चा वापर करून बसस्थानकांवर सुधारणा करण्यात येणार आहे. बसस्थानकांच्या सुरक्षेबाबत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत
पुण्यातील आरोपी पकडण्यासाठी बसस्थानकातील सीसीटीव्हीची मदत मिळाली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा चांगली होती, हे सिद्ध झाले आहे. दुसऱ्या डेपोत सीसीटीव्ही कार्यान्वित नसेल, तर दुरूस्त करण्यात येतील,” असे सरनाईक यांनी सांगितले.
अनेक बसस्थानकावर मी अचानक भेटी दिल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील 23 सुरक्षारक्षकांना बदलण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला बसचा दरवाजा उघडा असल्याची कल्पना होती. ही बाब भविष्यात पोलीस तपासात समोर येईल,” असे सरनाईक यांनी म्हटले
CCTV and GPS system mandatory in ST buses, informed by Transport Minister Pratap Saranaik
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…