Uddhav Thackeray हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करा, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी राज्यभर याविरोधात आंदोलन करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 29 जुलै रोजी शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. Uddhav Thackeray

हिंदी सक्तीच्या निर्णयासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आज राज्यभरातील जिल्हा प्रमुखांशी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. यावेळी हिंदी सक्तीविरोधात रविवारी दुपारी 3 वाजता शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हिंदी सक्ती विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि शालेय शिक्षण विभागाकडून हिंदी सक्तीचा जो शासन निर्णय काढण्यात आला आहे, त्या शासन निर्णयाची होळी करा. हिंदी भाषेला आपला विरोध नाही. मात्र सक्तीला विरोध आहे. मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. Uddhav Thackeray



महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 जुलैला गिरगाववरून मोर्चा काढणार आहे. यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरे यांनी सांगितले होते की, या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्यामुळे आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले होते. याचपार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगतिले की, राज ठाकरे यांनी त्यांना फोन केला होता. राज ठाकरे यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Celebrate the government’s decision to make Hindi mandatory, Uddhav Thackeray orders his workers

महत्वाच्या बातम्या