Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांचा अजितदादा, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन 120 चा स्पीड

विशेष प्रतिनिधी

इगतपुरी : राज्याला वेगाने विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षातही 120 च्या स्पीडने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सारथ्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (5 जून) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील इगतपुरी बोगद्याच्या लोकार्पनानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचं सारथ्य स्वीकारले, तर तिथून परत येताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडीचं सारथ्य केलं. या प्रवासाचा अनुभव अजित पवार यांनी सांगितला.



समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, समृद्धी मार्गावरून जाताना ऑडी गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते आणि मागे मी बसलो होतो. एकनाथ शिंदे गाडी व्यवस्थित चालवत आहेत की नाही, हे मी पाहत होतो. माझ्या बाजूला अनिल गायकवाड आणि मनीषा म्हैसकर होत्या. जाताना गाडी व्यवस्थित गेली. ही सुरुवात होती, त्यामुळे धोका न पत्करता एकनाथ शिंदेंनी सारथ्य केलं. पण येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं.

अजित पवार म्हणाले की, हे बाबा गाडीवर बसल्यावर ही गाडी चालणार नाही. त्यामुळे आपण लँड क्रूझर घेऊया. लँड क्रूझर गाडी निरंजन डावखरे यांची होती. त्यांनी सांगितलं की गाडी द्या. त्यांनी लगेच गाडी दिली आणि देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवायला घेताच गाडीने 100 चा स्पीड घेतला. मग 120 च्या स्पीडने गाडी जाऊ लागली. टनेल येईलपर्यंत गाडीचा स्पीड 120 होता. पण टनेल सुरू झाल्यावर 100 स्पीडवर गाडी आली, कारण टनेलमध्ये 100 स्पीडचा नियम होता. असं नियमांचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही येथे पोहोचलो.

Chief Minister Devendra Fadnavis speeds at 120 with Ajitdada, Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या