विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Shinde Speech मुंबई येथील शिवतीर्थावर पार पडलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. मोदी म्हणाले- या विधानसभेची माझी ही शेवटची सभा असणार आहे. मी सर्वत्र दौरा केला, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. सगळीकडून मला लोकांचे भरगोस प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. तसेच महायुतीला देखील महाराष्ट्राने प्रेम दिले आहे. CM Shinde Speech
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मैदानात बाळासाहेबांचे शब्द ऐकून लोकांच्या हृदयात अंगार जाणवत होते, आज त्या मंचावरून पंतप्रधान मोदींची गर्जना ऐकू येईल. इथूनच बाळासाहेब विचारांचे सोने वाटायचे. आज पीएम मोदी आले आहेत. दसऱ्यासारखी वेळ आहे. दिवाळी 23 तारखेला साजरी करायची आहे. फटाके तयार करा.CM Shinde Speech
मोदीजी, आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी 1.5 ट्रिलियन रुपयांचे योगदान देऊ. जे काम आजतागायत झाले नाही ते आम्ही दोन वर्षात पूर्ण केले. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषा ऐका हे बंद करणार, ते बंद करणार, मग सुरू काय करणार? CM Shinde Speech
Wadgaon Sheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश
एक योजना ज्याने खेळ बदलला, लाडकी बहीण योजना, ही योजना हिट आहे. म्हणूनच महाविकास आघाडी कोमात गेला आहे. म्हणूनच ते आमच्या योजनेला विरोध करतात आणि आता तेच चोरत आहेत. त्यांनी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे म्हणाले. हे कॉपी पेस्ट आहे. एक महाशक्ती आमच्या पाठीशी आहे..त्याचे नाव आहे मोदी. त्यांची मशाल घराघरात आग लावत आहे, असा आरोप देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली आहे. भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता सादर केली, कभी ठंड में ठिठुर कर देख लेना… कैसे की जाती है देश की हिफाजत मोदी जी से सिख लेना… CM Shinde Speech
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम मी मोदीजींचे अभिनंदन करतो. काही लोक फेसबुक लाईव्ह करतात आणि स्वतःला उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणवून घेतात. मी यावर जास्त काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले, मागील सरकारांनी 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो बांधली. आम्ही 300 किलोमीटरची योजना आखली. पुढे त्यांनी मुंबईतील लोकांच्या घरांच्या आणि इतर पुनर्विकासावरही भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी केलेल्या कामावर मते मागत आहे. माझा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना प्रश्न आहे, माझा महाविकास आघाडीला प्रश्न आहे, उलेमांची मागणी मान्य करण्यापूर्वी तुम्ही वाचले का, त्यांची मागणी होती.. दंगलीत सहभागी असलेल्या मुस्लिमांची सुटका करा. जर तुम्ही जिहाद कराल तर आम्ही त्याला धर्म युद्धाने उत्तर देऊ.CM Shinde Speech