विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Vadettiwar काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली. वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागण्याची मागणीही अनुयायांकडून करण्यात आली आहे.Vijay Vadettiwar
याबाबत राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “आमच्या सर्वांचे आराध्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान अयोग्य आणि निंदनीय आहे. परंतू, ही काही नवीन गोष्ट नाही. विजय वडेट्टीवार आणि त्यांचे सहकारी गरज पडेल तेव्हा मुस्लीम तुष्टीकरणासाठी हिंदू धर्म, हिंदू देवता, अध्यात्मिक गुरुंना टार्गेट करतात. यावेळीसुद्धा त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तीबद्दल अपशब्द काढले असून ते कुणीही सहन करणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माफी मागावी. नरेंद्राचार्य महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी मोठे कार्य केले असून कदाचित विजय वडेट्टीवार यांना याबाबत माहिती नसेल.
Complaint against Vijay Vadettiwar for insulting remarks about Narendracharya Maharaj
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…