आका,आका…च्या जागी आता मांडवली मांडवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सुरेश धस यांच्यावर आरोप

आका,आका…च्या जागी आता मांडवली मांडवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सुरेश धस यांच्यावर आरोप

विशेष प्रतिनिधी

बुलडाणा: Suresh Dhas धनंजय मुंडे यांचे प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार सुरेश धस यांना दिलेली सूचना होती. त्याच्या पलीकडे जाऊन पहिले आका,आका… बंदूक बंदूक बंदूक …. रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर… असे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जात होती. मात्र, आता  हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली… या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येतय, असा आरोप काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. Suresh Dhas

माझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही मला अटक केली जाईल किंवा मला कोणाचा फोन येईल, चूप बैस असं बोल तसं बोल, असे सांगता येईल.. त्यामुळे माझ्या नियुक्तीमुळे विरोधक घाबरले आहेत, असेही ते म्हणाले. Suresh Dhas

सपकाळ म्हणाले, भाजपची पॉलिसी अशी राहिली आहे की, आपल्या विरोधात कोणाला बोलू द्यायचं नाही. पण माझ्या नियुक्तीमुळे ते आता घाबरलेले आहेत. आता मी त्यांचे वाभाडे काढल्याशिवाय राहणार नाहीमाझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही. त्यामुळे ओसाड गावची पाटीलकी अशी माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे.

Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

सकपाळ म्हणाले, काँग्रेस पक्ष सव्वाशे वर्षाचा जुना आहे .या पक्षाला इतिहास आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे थोड्या दिवसात देणारच आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, पक्षासाठी ही महत्त्वाकांक्षा आहे की, पक्ष मजबूत व्हावं, मी कुठलीही गटबाजी करणार नाही . मी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला मार्गदर्शन करतील त्यानुसार मी चालेल.

लाडकी बहीण योजनेवर ते म्हणाले, मूळ मुद्दा असा आहे की, पैसे नसताना अनेक योजना चालू केल्या. विकासाची कामे सुरू केली. फक्त त्याचे भूमिपूजन करून टाकले. आता ठेकेदाराला पैसे द्यायला तिजोरील पैसे नाहीराज्यात 2000 कोटी रुपयांची महसुली तूट आहे. आता भाजपाने केंद्रातून दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणून ही महसुली तूट काढावी अशी अपेक्षा आहे.

Congress State President Sapkal accused Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023