Swargate rape case : दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध, स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलाचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Swargate rape case स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बस मध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वतःहुन बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे.Swargate rape case

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी काल मध्य रात्री आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले आहे.दरम्यान हा गुन्हा एवढा गंभीर नसून त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे. हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटल आहे

दरम्यान आरोपीने पिडीतेवर दोनवेळा बलात्कार केला तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. अधिक चौकशीसाठी तसेच आरोपी बरोबर आणखी काही जण होते का त्याला आणखी कोणी मदत केली का हे तपासण्यासाठी १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाकडून बारा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Consensual sex, Swargate rape case accused Dattatray Gade’s lawyer claims

महत्वाच्या बातम्या