विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. मूळचा सोलापूरचा असलेला हा तरुण पुण्यातील डीएसके विश्व मध्ये राहत होतास. पुण्यात या रोगाचेअनेक रुग्ण आढळले आहेत, काहींची प्रकृती गंभीर आहे.
पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव झाला सुर असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा दुर्मिळ आजार असून, त्याचे लक्षणे म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. पुणे महापालिका अलर्टवर आहे.
या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता. पण त्याला परत श्वासनाचा त्रास झाल्याने त्या तरूणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या घटनेत, गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार झाल्यानंतर न्यूमोनिया होऊन एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या रुग्णावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृति (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला नोव्हेंबर महिन्यात जीबीएसचे निदान झाले होते. जीबीएसनंतर रुग्णाला न्यूमोनिया झाल्याने गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू झाला, असे वायसीएम रुग्णालयाने सांगितले.
२९ डिसेंबर रोजी वायसीएम या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर मृत्यू मंगळवारी रात्री (२१ जानेवारी) रोजी झाला. रुग्णाला ताप आणि दोन्ही पायांमधील शक्ती कमी झाल्याने १७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही पाय आणि हातांमधील कार्यक्षमता कमी झाली. तपासणीमध्ये १९ नोव्हेंबर रोजी रुग्णाला जीबीएसचे निदान झाले. यानंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला.
Death of a woman along with a young man due to GBS outbreak in Pune
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार