शायना एनसी यांच्या विरोधात मानहानीचा खटला, न्यायालयाने मागवला पोलिसांचा अहवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी शायना एन.सी. आणि इतर १२ जणांविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. ही तक्रार प्रथम न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी संकीर्ण अर्जाअंतर्गत दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारीत आरोपी म्हणून नाव असलेल्यांमध्ये शायना एन.सी., गणेश के. मुरुगन, कुणाल तरुणकुमार शुक्ला, जेरोम डिसोझा, दिनेश तेजराज जैन, अविनाश रघुनाथ सूर्यवंशी, झोरावर सिंग गोहिल, प्रियेश शाह, शैलेश लालजी पांडे, नितीन बी. पांडे, महेश चव्हाण आणि वकील हर्ष शर्मा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त @befittingfacts या ट्विटर हँडलचे आणि आमची मुंबई या फेसबुक पेजच्या अज्ञात प्रशासकांनाही आरोपी करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांदरम्यान ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात काही व्यक्तींवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि वक्तव्ये शेअर करून जातीय सलोखा बिघडवल्याचा आणि त्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की, शायना एन.सी. आणि इतर आरोपींनी आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित मजकूर शेअर करून त्यांची बदनामी करण्याचा कट रचला.

Defamation Case Filed Against Shaina NC; Court Seeks Police Report

महत्वाच्या बातम्या