विशेष प्रतिनिधी
मुंबई : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गदारोळ झाला. दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी हा गदारोळ सुरु झाला. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे विधान परिषदेत आक्रमक झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भागृहात उत्तर देताना म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारण केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. तथापी माननीय विरोधी पक्ष नेत्याला एवढच सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील.
1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर होता. या प्रकरण कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनवाली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Devendra Fadnavis clarified the decision after the court order regarding Manikrao Kokate’s resignation.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…