विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला. आयएफएफसीओमध्ये घोटाळा झाला, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.Anjali Damania
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दमानिया म्हणाल्या, ‘अनेक लोकांना असं वाटतंय की मी जे जे मांडत आहे, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, कृषी घोटाळा असो हे सर्व मांडण्याची गरज काय? धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय? संतोष देशमुखांची जी हत्या झाली, त्याबद्दल सर्वांना जो आक्रोश आहे, आणि या प्रकरणात आतापर्यंत आपल्याला नीट कारवाई होताना दिसत नाहीये. अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला वाटतंय आहे की, जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत या हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही.