विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dharavi धारावी पुनर्विकास प्रकल्पात गणेशनगर आणि मेघवाडीतील २४ रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्याने ‘धारावी बचाव आंदोलन’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. Dharavi
प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गणेशनगर आणि मेघवाडी भागातील २४ रहिवाशांना आपली घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटीसविरोधात धारावीतील रहिवाशांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या नोटीसांमुळे धारावीतील घराच्या बदल्यात घर या आश्वासनाचे उल्लंघन केले जात असून नागरिकांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचा डाव असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलन या सर्वपक्षीय समितीने केला आहे. Dharavi
डीआरपीच्या या दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समितीतर्फे आज सायंकाळी ६ वाजता ९० फूट रोडवर एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून रहिवाशांचा असंतोष आणि प्रकल्पातील अपारदर्शकता समोर आणण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे.

Direct eviction notice, protest against Dharavi redevelopment project
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध