विशेष प्रतिनिधी
सांगली : Chandrahar Patil आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून याविरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.Chandrahar Patil
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला कुस्ती स्पर्धा घेण्याची विनंती केली होती. कुस्तीगीर परिषदेकडून याबाबत घोषणा करण्यात आली. मार्च महिन्यात कर्जत- जामखेडमध्ये कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने विरोध दर्शवला आहे. संघाने कुस्तीपटूंना पत्र काढून कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त कोणत्याही संघटनेला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार नसल्याचे पत्रात म्हटले आहे. कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त इतर कोणीही घेतलेल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले, चार चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान आहे. हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी,अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेचाही एक संघटना असली पाहिजे, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Double Maharashtra Kesari Chandrahar Patil will go on hunger strike against Rohit Pawar’s wrestling competition
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत