विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वीपासूनच जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे, याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री गुप्त भेट घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार तासभर ही बैठक झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भेट झाली. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेऊन भाजपसोबत जाण्यापूर्वीपासून जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असे बोलले जात होते. याचे कारण जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अनेक मुद्यांवरून मतभेद होते. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यावर जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली.
पण आता जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातं रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे खटके उडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बीडमधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा पुरस्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा महायुती सरकारमधील धुसफूस असो. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत कुठे ?
असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांनी बोलणे सोडले आहे. जयंत पाटलांच्या संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळीही चर्चा झाली होती.
Earthquake again in the NCP Sharad Pawar group? Jayant Patil- Chandrasekhar Bawankule secret meeting
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा