Eknath Shinde :काळे धंदे बाहेर काढेल, म्हणून लागली मिरची, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे मैदानात

Eknath Shinde :काळे धंदे बाहेर काढेल, म्हणून लागली मिरची, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे मैदानात

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde  डॉ. नीलम गोऱ्हे खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांचे समर्थन केले. ( Eknath Shinde in the field in support of Neelam Gorhe )Eknath Shinde

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा आरोप डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. गोऱ्हे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

एकनाथ मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली.
नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा. परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं की मिरच्या लागल्या. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. नीलम गोऱ्हेंच्या आधीही अनेक लोक हे बोलले आहेत.

हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता असे सांगत ते म्हणाले, जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हाला रोज आम्हाला शिव्याशाप दिले. मी कधीही आरोपाला उत्तर दिलं नाही. मी कामातून उत्तर दिले. त्यामुळे महायुती सरकार लोकप्रिय ठरलं. जेव्हापासून यांची खुर्ची गेली, तेव्हापासून यांना मिरची लागली आहे. त्यांचं पोट दुखत आहे.

राज ठाकरे बोलले होते त्यांना खोके नाही कंटेनर लागतात, असे . नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे असे अनेकजण बोललेत. हे काही नवीन नाही. पण नीलम ताई बोलल्यानंतर त्यांच्या मागे इतके लागले, त्यांना इतक्या मिरच्या लागल्या, पण नीलम ताईंवर इतक्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. त्या खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे.

नीलम गोऱ्हे या महिलेंवर अत्याचार झाला किंवा इतर काहीही झालं तर त्या पहिल्या धावून जायच्या, तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या. आताही शक्ती विधेयकात त्यांचे मोठं योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करतात. हीच पोटदु:खी आहे. ती पोट:दुखी थांबत नाही, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाहीत, कंपांऊडरकडून औषध घेतात”, असा टोला संजय राऊत यांच्या संदर्भात लगावला.

Eknath Shinde in the field in support of Neelam Gorhe

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023