विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Devendra Fadnavis मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याला अमेरिकेने परवानगी दिली आहे. २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले की, “मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्यासाठी अमेरिकेने होकार दिला असून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यासाठी अमेरिका प्रशासनाला तयार केले. मागच्या काळात आम्ही तहव्वूर राणाची ऑनलाईन साक्ष मिळवली. त्यामुळे यात पाकिस्तानचा हात असल्याचे आपण दाखवू शकलो. पण त्यावेळी तो आमच्या सुरक्षेत असल्याने आम्ही त्याला देणार नाही, असे अमेरिकेने सांगितले होते. मात्र, तो भारताला अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान मोदींनी रेटली. त्यामुळे तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली असून आता २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन नवीन कायद्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली. राज्यांमध्ये या कायद्यांची अंमलबजावणी कशी झाली आणि या कायद्यांअंतर्गत आतापर्यंत किती केसेस दाखल झाल्या आहेत, यासाठी ही बैठक होती. महाराष्ट्रात या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे सुरु केली आहे. याबाबत आम्ही सगळी माहिती दिली. ही बैठक अतिशय चांगली झाली असून आम्हाला यातून चांगले मार्गदर्शन मिळाले. हे तिन्ही कायदे लागू करण्याबाबत आम्ही अधिक वेगाने काम करू,” असेही ते म्हणाले.
Final justice to the 26/11 attack due to the extradition of Tahavur Rana! Devendra Fadnavis thanked the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…