विशेष प्रतिनिधी
Satara News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावे लागलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी सह्यादी कारखान्यावरची सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनेलने भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या पॅनलचा पराभव केला आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनेलने भाजपच्या आमदारांसह भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा सुपडा साफ केला आहे. त्यांचे सर्व उमेदवार 7500 ते 8 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला गेला.
“कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांच्या विचारासोबत राहणाऱ्या मतदाराने पी.डी. पॅनलवर विश्वास टाकला. 1999 पासून 2 टर्म आणि त्यानंतर मतदार फेररचना झाल्यानंतर 3 टर्म मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवारांनी मला सहकार खात्याची जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला, माझाही झाला. पण पराभवाने खचून जायचे नसते. विजय झाला तर विजय पचवता आला पाहिजे,” अशा भावना यावेळी बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
विधानसभेच्या विजयानंतर काही लोकांनी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक जिंकणार अशा वल्गना केल्या होत्या. कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. आपण दिमाखाने निवडणुकीला सामोरे गेलो. 31 जानेवारीला या गावात सभा झाली, दिशा निश्चित केली. त्यानंतर 80 गावात गेलो आणि खोटे नरेटिव्ह पसरवले होते, ते सर्व खोडून काढले, आपण सर्वांनी चांगले सहकार्य केले, त्या सर्व सभासदांना विजय समर्पित करतो,” असे म्हणत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
Former minister Balasaheb Patil retained control over the Sahyadri factory
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख