Chandrakant Khaire : राज्यपाल पदापासून खासदारकीपर्यंत… चंद्रकांत खैरे म्हणतात मला डबल ऑफर

Chandrakant Khaire : राज्यपाल पदापासून खासदारकीपर्यंत… चंद्रकांत खैरे म्हणतात मला डबल ऑफर

Chandrakant Khaire

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chandrakant Khaire लोकसभा निवडणुकीत पराभव झालेलं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्याला दोन बड्या ऑफर असल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला राज्यपाल पदाची तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेवर खासदारकीची ओफर मिळाल्याचे खैरे यांनी म्हटले आहे.Chandrakant Khaire

चंद्रकांत खैरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटात स्पर्धा सुरु झाली आहे. दोन्ही पैकी कोण शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना त्यांच्या पक्षात घेतो. असं सर्व सुरु आहे. ते एकमेकांना आमिष दाखवत आहेत. मात्र, आमचे शिवसैनिक त्यांच्या या आमिषाला बळी पडणार नाहीत. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका असो किंवा छत्रपती संभाजीनगर महापालिका असो आम्ही जिंकणार आहोत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमच्या विरोधात वातावरण खराब करण्याचं प्रयत्न सुरु आहे. मात्र, लोकांना हळूहळू सत्य समजेल.



मला अनेकवेळा ऑफर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून मला अनेक मोठमोठ्या नेत्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र, मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात काम करणार आहे. मला शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या आधी ऑफर होती. कारण त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार मिळत नव्हता. संजय शिरसाट यांनी दोन-तीन लोकांकडे सांगितलं होतं की त्यांना म्हणजे मला घेऊन या आम्ही सर्व खर्च करू वैगेरे, पण मी त्यांना नकार दिला”, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

“भारतीय जनता पक्षाकडून मला खूप वेळा ऑफर आली. भाजपाचे काही नेते माझ्याकडे अनेकदा येऊन गेले. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेते होते. मात्र, माझा संपर्क अनेक वर्षांपासून दिल्लीतील नेत्यांबरोबर देखील आहे. त्यामुळे मला दिल्लीमधूनही ऑफर आली होती. अनेक मान्यवरांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन जा. आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी आणि मंत्री करतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, तेव्हा मलाही सांगितलं की तुम्हाला राज्यपाल करू अशी ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना नकार दिला”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला.

From the post of Governor to MP… Chandrakant Khaire says double offer to me

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023