Gulabrao Patil गुलाबराव पाटील म्हणाले म्हणून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी

Gulabrao Patil गुलाबराव पाटील म्हणाले म्हणून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी

Gulabrao Patil

विशेष प्रतिनिधी

जळगाव : विचारधारा सोडून ज्यावेळेस माणूस राजकारणामध्ये पुढचा प्रवास करत असतो त्यावेळेस विचारधारेमुळे, जोडलेले लोक बाजूला जातात. विचारधारा शिंदेंसोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी होतांना दिसते आहे. यांनी निवडणुकीत घेतलेले निर्णय आणि आलेले अपयश, हे सगळे लक्षात आल्यावर बरेच लोकं शिवसेनेत वापसी करतायत. आगामी काळात अर्धी ठाकरे गटाची सेना ही शिवसेनेत आलेली असेल, असे भाकीत शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

नेतृत्व ज्यावेळी वेळ देत नाही, काम करण्यासाठी पुढाकार घेत नाही. जे निवडून आलेले असतात त्यांना पाच वर्षांनी मतदारांना सामोरे जायचं असतं. त्यामुळे लोकांच्या आता लक्षात येते की खरे काम करणारे कोण? आणि खरे काम करणारे हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे बरेच खासदार आमच्याकडे प्रवेश करतील असं मला वाटते असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले, या लोकांनी कधी चांगली काम केली नाहीत. त्यांची चांगले काम करण्याची मानसिकता नाही. मराठी माणसांकरता काम करण्याची इच्छा नाही. हिंदुत्वाचा मुद्दा या लोकांनी सोडलेला आहे. आता शिंदे यांनी अडीच वर्षांमध्ये जी चांगली काम केली त्याच आधारावर पवार बोलले. त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलाय. मी त्यांचा निषेध करतो. एखाद्या चांगल्या कर्तृत्वावान माणसावर केलेले आरोप, ही जनता त्यांना माफ करणार नाही, असा माझा इशारा आहे.

महाराष्ट्राची संस्कृती आहे की, जे लोक चांगले काम करत असतात, ते एकमेकांच्या विरोधात जरी विचारांमध्ये असले तरी त्याचं कौतुक करणं हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संस्कृती आहे. आणि शरद पवार यांनी त्याच आधारावर या ठिकाणी या शिंदे यांना पुरस्कार देत असताना त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण बाकीच्या लोकांनी असं कामच केलं नाही आणि न करता सुद्धा ते टीका करताय. उंची गाठणाऱ्या माणसाचा सत्कार होतो, त्यावेळेस या लोकांनी टीका करणे, ही हास्यास्पद बाब आहे आणि विरोधाला विरोध करणे, एवढा धंदा त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेला, असा टोलाही त्यांनी मारला.

काँग्रेस पुन्हा जोमाने काम करेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर गुलाबराव पाटील यांनी जोम कधी येणार तेच बघायचंय असे म्हणत काँग्रेसची खिल्ली उडवली.

Gulabrao Patil told why Operation Tiger is successful in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023