विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूरचे असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशीम जिल्ह्याचे पालक मंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर बोलताना आपण नाराज नाही असे म्हणता म्हणता मुश्रीफ यांनी आपली नाराजी मांडलीच.अजित पवार यांना मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. श्रद्धा आणि सबुरी ठेवायची आहे, असे ते म्हणाले. Hasan Mushrif
पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरला बैठका असल्याने वाशिममध्ये झेंडा फडकवून लवकर परत आलो.वाशिम लांब असल्याने तिथं मी रात्री वेळाने पोहचलो. सकाळी झेंडावंदन करून परतलो.पालकमंत्रीपद बदलण्याबद्दल आपल्याला माहिती नाही. नाराज असण्याचा सवाल नाही. पण मी माझ्या भावना अजित पवारांसमोर व्यक्त केल्यात बीड शवविच्छेदन अहवालाबाबत अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, चंद्रकांत पाटील स्पष्ट बोललेत. त्यामुळे पुन्हा बोलण्याची गरज नाही
छावा चित्रपटातील डान्सबद्दल संभाजीराजे, उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलीय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. छावा चित्रपटात इतिहासाला अनुरूप गोष्टी नसतील, तर त्यामध्ये दुरुस्त्या केल्या पाहिजेत, शी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचा पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबीटकरांच्या निवडीवर मुश्रिफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिलेली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं आहे. त्यामुळे मुश्रीफ यांची खदखद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Hasan Mushrif finally spoke on Guardian minster
महत्वाच्या बातम्या