Neelam Gorhe : ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची, डॉ.नीलम गोऱ्हे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Neelam Gorhe  ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची, असा आरोप विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.Neelam Gorhe

दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही त्या म्हणाल्या.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

डॉ. गोऱ्हे यांच्या आरोपाना उत्तर देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. 30 वर्षे त्यांनी आमच्या पक्षात काम केलं. नीलम गोऱ्हे यांनी जे आरोप केलेत, त्यात काही तथ्य असेल, तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही, प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. खरंतर, त्यांचा वार्षिक कमाईचा एवरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होता.
गोऱ्हेंची नमकहरामी आहे, असे सणसणीत प्रतिउत्तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. ते म्हणाले, मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही.

In Thackeray’s Shiv Sena, post will get if two Mercedes were given , Dr. Neelam Gorhe alleges

महत्वाच्या बातम्या