विशेष प्रतिनिधी
पुणे : MPSC exam अन्न व औषध प्रशासकीय सेवेमध्ये राज्यातून प्रदीप वसंत आंबरे हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील हा उमेदवार असून त्याला ३०२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अमृता शिरके तर तिसऱ्या क्रमांकावर प्रणव चंद्रकांत मोरे आला आहे. आयोगाने ६१५ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.MPSC exam
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २ व ३ जानेवारी २०२५ आणि ७ ते १० जानेवारी २०२५ आणि १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या.संबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सुविधा या मेनूमध्ये पोस्ट प्रिफरन्स वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक २२ जानेवारी २०२५ रोजी १२.०० वाजेपासून २८ जानेवारी २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
In the MPSC exam, Pradeep Ambre stood first in the state and Amrita Shirke stood second
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार