विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray राज्यातील विविध योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा सरकारने आपल्या भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावावा, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी सरकारच्या निर्णयांवर टीका केली.Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावा, म्हणजे राज्याची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही.
राज्यातील शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा बंद होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आर्थिक शिस्त पाळायला हवी, कारण राज्यावर १ लाख कोटींची बिले थकलेली आहेत. मात्र, त्यासाठी गरिबांना मिळणाऱ्या योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट नेत्यांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पाच रुपयात आम्ही थाळी देत होतो, पण आता आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सवर पैशांची उधळपट्टी केली जात आहे.”
टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणार असून, त्याचे स्वागत मुंबई आणि वरळीमध्ये करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान होतो आहे हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवर कोर्टाकडूनही ताशेरे ओढले जात आहेत, हे धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, हेच देशमुख आधी भाजपचे कार्यकर्ते होते, आणि त्यांच्यावरच अशी वेळ आली आहे.”
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री बसल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “बसेस खरेदी करण्याचा निर्णय झाला, त्यानंतर हे मंत्री अध्यक्ष होते का? एसटीच्या दरवाढीचा निर्णय परीक्षांच्या अगोदरच घेण्यात आला आहे, याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.”
सफाई कामगारांच्या चौक्यांबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कंस्ट्रक्शनचं काम कठीण असतं, पण त्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Instead of putting a brake on schemes, put a brake on corrupt partners, Aditya Thackeray’s attack on the government
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन