विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या आहे. पण भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे? माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांना जपणं म्हणजे भाजपाचे हिंदुत्व आहे का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray
अहिल्यानगर येथील कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, देशात, राज्यात जो काही अंदाधुंद कारभार सुरू आहे. तो थांबवून पुन्हा एकदा खऱ्या हिंदुत्वाचे सरकार स्थापित करणे, हेच आमचे ध्येय आहे. कारण निवडणुकीसाठी धर्मांधता दाखवण्याने देशाचे भले होणार नाही. त्यासाठी जे खरं हिंदुत्व आहे तेच प्रस्थापित करायला हवे. Uddhav Thackeray
देशातील तसेच राज्यातील सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, सध्या अंदाधुंद कारभार सुरू आहे. जनतेची गाऱ्हाणी ते ऐकून घेत नाहीत. त्यांनी जनतेला फसवले आहे.. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या रेवड्या उडवून जनतेला भुलवले आणि आता जनता ते भोगत आहे. या सर्वांवर मात करत जनतेचे आयुष्य सुखा समाधानाche करणं, हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. जे खरं हिंदुत्व आहे ते पुन्हा प्रस्थापित करायचं आहे.
हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता गाडगेबाबांचा दाखला देत ठाकरे म्हणाले, धर्म जगायचा असतो, सांगायचा नसतो असे गाडगेबाबा म्हणत. छत्रपती शिवरायांनी देखील कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे सांगितले नाही. मी देखील याच तत्त्वावर चालतो. जे या देशाला आपलं मानतात, ते आपले.
मी मुख्यमंत्री असताना देखील याच तत्त्वावर राज्यकारभार केला. याउलट नगरमधील अनेक पदाधिकारी हे शिवसेनेत गेले याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेना असल्याचे मी मानतच नसल्याचे नाही. शिवसेनेला संपवलं हा त्यांचा भ्रम असल्याचे ठाकरे म्हणाले.
Is keeping safe to Kokate, Munde Hinduism of BJP? Uddhav Thackeray’s question
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…