Anjali Damania : हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नव्हतं, अंजली दमानिया यांची सुरेश धस यांच्यावर टीका

Anjali Damania : हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नव्हतं, अंजली दमानिया यांची सुरेश धस यांच्यावर टीका

Anjali Damania

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Anjali Damania बीडच्या मोर्चाच्या पहिल्या दिवसापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही. याचे कारण स्पष्ट होते. मी धनंजय देशमुख यांना बोलून दाखवले होते हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर केला आहे.Anjali Damania

भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात अंजली दमानिया यांनी आता अंजली दमानिया उतरल्या आहेत. देशमुख हत्याप्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. मात्र, धस मुंडे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. धस यांच्यावर त्यांनी राजकीय सेटलमेंट केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

दमानिया म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस यांनी हा विषय इतका लावून धरला की मला वाटायला लागलं मी चुकले की काय? पण राजकारण्यांना भावना नसतात त्यांना हृदय नाही त्यांना कुणाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही. त्यांच्यासाठी तो राजकीय विषय असतो. मुद्दे मांडण्याचा विषय असतो. सेटलमेंट करण्याचा विषय असतो. तसंच काही आता झालेले दिसते.

धस यांनी मुंडे यांची भेट घेतल्याचे समजल्यावर

मला प्रचंड राग आला होता असे सांगत दमानिया म्हणाल्या त्यांचे पाय इतके चालले कसे? मुंडें यांच्या घराची पायरी त्यांनी चढलीच कशी? देशमुख कुटुंबियांसाठी बाजू लावून धरतायेत मग मुंडे यांच्या घराची पायरी चढले कसे?

दमानिया म्हणाल्या , मला खूप राग येतोय. असं वाटतं या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. म्हणूनच मी पहिल्या दिवसापासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले दोन मोबाईल आणि त्यात असलेला जो बड्या नेत्याचा फोन होता तो आजपर्यंत बाहेर आलेला नाही . त्यांना वाचवण्यासाठी सगळे सुरू झालेले आहे. त्यात फडणवीस, आहेत बावनकुळे पण आहेत आणि धस पण आहेत. धनंजय मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपल्याला बोलायलाच नको.

मला असं वाटतं हे सगळं आता बास झालं. ही सगळी चौकशी न्यायालयाच्या अधिपत्याखाली व्हायला हवी. तोपर्यंत खरे बाहेर येणार नाही. न्याय फक्त राजकारण्यांना मिळतो सामान्य जनतेला मिळत नाही, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.

It didn’t make sense to me that this man is fighting for justice, Anjali Damania criticizes Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023