विशेष प्रतिनिधी
नाशिक: Ashok Kharat महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग होता. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असा धक्कादायक दावा भोंदूबाबा अशोक खरात याने केला आहे.Ashok Kharat
नाशिकमध्ये विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरातची विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Ashok Kharat
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग होता. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असा दावा करताना खरात म्हणाला, माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन.
दरम्यान, तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खरातचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू असून, त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नाशिकमधील सरकार वाडा पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक भक्कम करण्याचा पोलिसांचा चा प्रयत्न आहे. यामुळे खरातच्या कथित गैरप्रकारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर खरातच्या शिवानिका संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरही तपास सुरू आहे. संस्थेची बँक खाती सील करण्यात आली असून, त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. राज्यभरातील जमीन, घरे आणि दुकाने यांचा तपशील नोंदणी विभागाकडून मागवण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमवली याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, करीअरचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर भाेंदूबाबा अशाेक खरात याने चार वेळा बलात्कार केल्याची फिर्याद एका तरुणीने दाखल केली आहे.अशोक खरातविरोधात पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली.
दोन वर्षे घर बांधू नका असे सांगत कुटुंबाला पुन्हा बोलावून अशोक खरात घेत होता. कुठल्या फिल्ड मध्ये शिक्षण घेऊ,चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच खरातने तिच्या आई-वडीलांना केबीन बाहेर काढले. मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला दिले. ते पाणी थोडे बेचव लागले. त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझ्या डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले. तो बोलेल त्याप्रमाणे मंत्र म्हणायला लावले. त्यानंतर ताे माझ्या पाठीमागे येवून उभे राहीला.
त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले. मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले. त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला. मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तु कर असे सांगत मंत्र म्हणायला लावले. नंतर माझे लैंगिक शोषण केले. मी विरोध केला तर त्याने धमकी दिली तु जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितले तर मी माझ्याकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन. तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भीती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता. अशोक खरातच्या दबावामुळेच त्याचा ऑफीस बॉय नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केल्याचे तरुणीने सांगितले. पीडित तरुणीने याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. आता अशोक खरातचे नवीन कारनामे समोर आल्यानंतर पीडितेने नव्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
It was part of a ritual, no one was forced, claims Ashok Kharat
महत्वाच्या बातम्या