जिहाद’ हा केवळ अपप्रचार नसून ते एक नियोजनबद्ध षडयंत्र, हेमंत पाटील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात जबरदस्तीने, आमिष दाखवून, फसवणुकीद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना चाप घालणारे आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेले महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. सध्या या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे.

आज (17 मार्च) विधान परिषदेत महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावर आपली भूमिका मांडताना आमदार हेमंत पाटील यांनी ‘लव्ह जिहाद’ हा केवळ अपप्रचार नसून ते एक नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचे म्हणत विधेयकाचे स्वागत केले आहे.

हेमंत पाटील म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ हा केवळ अपप्रचार नसून ते एक नियोजनबद्ध षडयंत्र आहे. नांदेडसारख्या शिक्षण केंद्रात हिंदू मुलींना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत सुमारे 150 हिंदू मुलींना फसवून पळवून नेण्यात आले आणि हैदराबाद, कोलकाता येथे त्यांचे धर्मांतर करण्यात आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानणारे आहोत. एका बाजूला छत्रपतींनी परस्रीचा सन्मान केला, तर दुसरीकडे आज औरंगजेब आणि खिलजीची विचारधारा मानणारी मंडळी वाढत आहेत, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच औरंगजेबाच्या काळात ‘जिझिया’ करामुळे अनेक हिंदूंना नाईलाजास्तव धर्मांतर करावे लागले होते, असे म्हणत



औरंगजेबाच्या काळात ‘जिझिया’ करामुळे अनेक हिंदूंना नाईलाजास्तव धर्मांतर करावे लागले होते, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात इतिहासाचा दाखला दिले. याशिवाय गोव्याचा इतिहास आणि वसई-विराारमधील ख्रिश्चनीकरणावरही त्यांनी भाष्य केले. किनवट आणि माहूरमधील बंजारा समाजात सेवाभावी संस्थांच्या नावाखाली पैशांचे आमिष दाखवून धर्मांतर केले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

हेमंत पाटील म्हणाले की, 150 कोटी लोकसंख्येमुळे देशाच्या साधन-संपत्तीवर ताण येत असून, एका विशिष्ट समाजात लोकसंख्या वाढीवर निर्बंध नसल्याने त्याचा परिणाम थेट राजकारणावर आणि मतदानावर होत आहे. त्यामुळे चीनप्रमाणे भारतातही ‘एक कुटुंब, एक मूल’ हा कायदा आणल्यास देशाची प्रगती वेगाने होईल, असे म्हणत हेमंत पाटील यांनी धर्मांतरासोबतच देशात ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ आणण्याची मागणी लावून धरली.

तसेच भाषणाच्या शेवटी हेमंत पाटील यांनी या विधेयकाची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली. धर्मांतरासाठी वापरले जाणारे ‘जादूटोणा, वशीकरण आणि संमोहन’ यांसारख्या मार्गांवरही बंदी घालावी. कारण संमोहनाद्वारे मुलींना पळवून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे केवळ धर्मांतर करणाऱ्यावरच नव्हे तर या कामी मदत करणाऱ्या मध्यस्थांवरही कडक कारवाई ,व्हावी, अशी ठाम भूमिका हेमंत पाटील यांनी मांडली.

‘Jihad Is Not Just Propaganda but a Planned Conspiracy,’ Claims Hemant Patil

महत्वाच्या बातम्या