विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जाणूनबुजून असे वक्तव्य केले जाते हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून अनावधानाने हे वक्तव्य गेले हे बिलकुल जाणवत नाही, मी सभागृहातच होतो. ते मुद्दाम अशी वक्तव्य करतात. त्यांना याची कठोर किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे. shambhuraje Desai
शंभुराज देसाई म्हणाले की, काल धर्मांतरविरोधी बिलावर सभागृहात चर्चा सुरू होती. यावर जितेंद्र आव्हाड बोलताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत असताना शिवरायांच्या राज्याभिषेकांच्या अनुषंगाने अपमानास्पद असे वक्तव्य केले. मी ते ऐकून त्यावर हरकत घेतली, तालिका अध्यक्षांकडे मागणी केली की हे वक्तव्य काढून टाका, आव्हाडांना माफी मागायला लावा.पण आव्हाड काही माफी मागायला तयार नव्हते. सभागृह तहकूब झाले. अध्यक्षांनी आव्हाडांना 3 वेळा सांगितले की दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घ्या. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा आव्हाड सभागृहात मोबाईलवर काही तरी बघत होते. कुणाशी तरी बोलत होते. इतकं अपमानास्पद वक्तव्य करुनही त्यांना त्यांचे काहीच गांभीर्य नव्हते.
शंभुराज देसाई म्हणाले की, आपल्याकडून जर एखादे वक्तव्य चुकीने गेले असेल तर चेहऱ्यावरील हावभावावरुन ते लक्षात येते. पण जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावर ते वक्तव्य चुकीने गेले असे काहीच हावभाव नव्हते. शेवटी अध्यक्षांनी निर्देश दिले की माफी मागावी. निर्देश दिल्यावरसुद्धा त्यांनी केवळ त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांनी कारवाई करू अशी कडक भूमिका घेऊ म्हटल्यावर त्यांनी ते शब्द माघारी घेतले. त्यांना निलंबित करावे अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. पण अध्यक्षांनी त्यांना अखेरची समज दिली.
शंभुराज देसाई म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अजून झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढवली गेली नाही त्या ठिकाणांचा रिपोर्ट एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, बावनकुळे, तटकरे, मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू.
शंभुराज देसाई म्हणाले की, दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते त्यावेळी शिवसेना खासदारांची बैठक घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात असतात. त्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते तिथे जात असतात. जिल्हा परिषद निवडीसंदर्भात दिल्लीला जाण्याची गरज नाही, तो राज्यातील प्रश्न आहे. केवळ खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत.
Jitendra Awhad Will Have to Pay the Price: Shambhuraje Desai’s Warning
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास