विशेष प्रतिनिधी
मुंबई: महिलांवर अत्याचार केल्याचे अनेक गंभीर आरोप असलेल्या नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ज्या भोंदू बाबाचे पाद्यपूजन केले व ज्याच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचे अनेक गंभीर आरोप असून गुन्हे दाखल आहेत, अशा अशोक खरातचा संबंध अजित पवारांच्या अपघातात हात आहे का? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, कॅप्टन खरात नावाच्या भोंदू बाबाचा भांडाफोड काल पासून सुरू आहे. त्याच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीत जप्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचे कळत आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा VSR विमान कंपनीच्या पायलटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी सहयोगी सोसायटी आणि देवगिरि बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक थोरातच्या सांगण्यावरून झाला का? आणि याचा धागा VSR कंपनीपर्यंत जात असेल, तर अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरातचा हात असल्याचा संशय बलावतो. म्हणून अजित दादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन थोरात याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
Link Between ‘Fraud’ Captain Kharat and Ajit Pawar Crash? Amol Mitkari Seeks Probe
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास