बीड जिल्ह्यात वाल्मीक कराडच्या मर्जीतील दोनशेवर पोलीस, आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांना देणार यादी

बीड जिल्ह्यात वाल्मीक कराडच्या मर्जीतील दोनशेवर पोलीस, आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांना देणार यादी

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हयातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस दलाकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. आता तर वाल्मीक कराडच्या मर्जीतील दोनशेवर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. त्यांना बीडच्या बाहेर लांब नेऊन टाका अशी मागणी करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 अधिकारी वाल्मीक कराडला याच्या मर्जीतील आहेत असा आरोप केला होता. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा २६ हा आकडा कमी आहे. सगळे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांची बेरीज केली तर ती दोनशेवर जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याची यादी देणार आहे. बीड जिल्ह्याच्या बाहेरच मराठवाड्यातच नाही तर लांब नेऊन टाका यांना असं मी त्यांना सांगणार आहे.

पोलीस दलातील आकाचे प्रेमी सध्या अरेरावीची भाषा बोलत आहेत. याच पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहनामध्ये बंदुका ठेवल्या होत्या. त्यामुळ पोलीस अधीक्षकांनी या लोकांना अजूनही सेवेत कसं काय ठेवलंय? हे मी किती वेळा सांगतोय, इतक्या शांत आणि थंड पद्धतीनं काम केल्यावर बीड जिल्हा कसा कन्ट्रोल होणार? असा सवालही धस यांनी केला.

अधीक्षकांनी परळीतील दहा-वीस लोक गायब झाल्याचा तपास उपअधीक्षकांकडं दिला आहे. जर परळीतील लोक गायब झाले असतील तर मग महादेव मुंडेंचे आरोपी आजपर्यंत आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. आता ते अचानक गायब झाले आहेत, याचा तपास ज्यांच्याकडं सोपवलाय त्या डीवायएसपी यांनी अद्याप चार्जही घेतलेला नाही. त्यामुळं त्यांच्याकडं हा तपास देण्याऐवजी स्थानिक गुन्हे शाखेकडं हा तपास द्यावा. हे डीवायएसपी आकानंच आणलेले आहेत तर तुम्ही त्यांच्याकडं कसा तपास देता. महादेव मुंडेचे खुनी सापडले पाहिजेत, १५ महिने झालेत त्यांचा निर्घृणपणे खून केला आहे. तरीही त्याचा तपास होत नाही म्हणजे काय? असा सवाल त्यांनी केला.

List of 200 policemen in Beed district in favor of Valmik Karad, MLA Suresh Dhas to give list to Chief Minister

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023