Mahajan and Khadse महाजन – खडसे यांच्यात पुन्हा जुंपली, एकमेकांची संपत्ती काढली

विशेष प्रतिनिधी

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

संपूर्ण राज्याला माहिती आहे, की कोण तुरुंगात गेले तसेच कोण चो-या करत आहे. तसेच दिल्लीला जाऊन कोणी माफी मागून लोटांगण घातले, अशा शब्दांत महाजनांनी खडसेंना सुनावले होते. यावर मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. त्यांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न करत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना डिवचले. मला लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही, तुमच्या वरिष्ठांशी आजही माझे चांगले संबंध आहेत. माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालण्याची काय गरज? असा टोलाही महाजनांना लगावला आहे. गिरीश महाजन यांनी कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची यादी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे, असा इशारा खडसेंनी दिला.

मी कुठल्याही मुरूम चोरीचा प्रकार केला नाही, महाजन यांचीच प्रवृत्ती खोटे गुन्हे दाखल करण्याची आहे. ‘ईडी’चाही खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम केले. माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी हे कुणी केले, कसा गुन्हा दाखल केला, हे सर्वांना माहिती आहे. गिरीश महाजन हे मूळ मुद्यावरून मागे फिरतायत, महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्यात मी जमीन आता घेतलेली नाही. माझ्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, असा दावा देखील एकनाथ खडसेंनी केला.

मी महाजनांना १०० एकरचे उतारे देखील दाखवतो. त्या उलट यांचे वडील शिक्षक असताना हजारो कोटींची मालमत्ता तुमच्याकडे आली कशी? ठिकठिकाणी मालमत्ता तुम्ही कशा घेता? मी दिल्लीला जाऊन कधीही लोटांगण घातलेला नाही, मी लोटांगण घातलं असतं तर माझ्यावरील ईडी कधीच निघून गेली असती. माझ्या कुटुंबाचे वाटोळे करण्याचे काम या लोकांनी केले. महाजनांच्या प्रॉपर्टीची चौकशी अँटी करप्शनमार्फत करावी, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

पुणे-मुंबई-जामनेर अशी अनेक ठिकाणी महाजनांची मालमत्ता आहे. ही कुठून अन् कशी आली. गिरीश महाजन अनेक गुन्ह्यांत अडकले असते, तर मी त्यांना मदत केली असती. गिरीश महाजन हा माझे बोट धरून मोठा झाला, हे जगाला माहिती आहे. बंदुकीचे प्रकरण, अर्धापूरचे प्रकरण या विषयांमध्ये मी त्यांना वाचवले. गिरीश महाजन यांच्या संपत्तीचे विवरण दाखवावे, असे आव्हान देखील खडसेंनी दिले.

Mahajan and Khadse clash again, allegations over each other’s wealth

महत्वाच्या बातम्या